आपण सारेच अभिमन्यू !
काही स्वेछेनी अडकलेले, काही मुद्दाम अडकवलेले ..
सुटकेचा मार्ग शोधता शोधता, लढून लढून थकलेले ..
प्रत्येकाची चक्रव्यूह वेगळी, पण अपेक्षा मात्र तीच..
शक्य - अशक्यचा विचार न करता, जिंकण्याची उर्मीही तीच !
पण असतात काहीजण, लढाई अर्ध्यातच सोडून देणारे
नवी वाट शोधायची सोडून धोपटमार्ग स्वीकारणारे..
पण असेही असतात काही ज्यांच्या जगण्याला,
लढण्याशिवाय काही अर्थच राहत नाही.. !
काही नुसतंच लढणारे, काही लढता लढता जगणारे..
तर काही नुसतच जगणारे..
शेवटी काय.. आपापल्या नजरेत आपण सारेच अभिमन्यू.. !
- ıɥsıɹH
impressive!
ReplyDeletethanks sukanti ! :)
ReplyDelete