फक्त एकदाच !
ढग दाटून येतात, भाजून काढणारं ऊन जरा नाहीसं होतं..
सूर्याचा नावापूरता का होइना, पण लपंडाव सुरू होतो..
पुण्याच्या एखाद्या सायकलस्वारासारखे मोकाट वारे सुटतात..
उन्हानं पार सुकून गेलेली पानं त्यावर उडून कुठच्या कुठे जाऊन पोचतात..
आपण डोळे लावून बसतो त्या काळ्या ढगांच्या पूंजक्याकडे.. की ह्या उन्हाळ्यात एकदातरी धो-धो कोसळ !
तो ओल्या मातीचा पहिला गंध साठवून ठेवण्यासाठी..
त्या भिरभिरं लागल्यागत उठलेल्या वावटळीला शांत करण्यासाठी..
रात्री फ्लाय-ओवर वरून दिसणाऱ्या एका धुरकट चित्राला साफ करण्यासाठी..
रोजच्या धावपळीनी घामेजून गेलेल्यांना चिम्बं भिजवून थोडं का होई ना, पण ताजंतवानं करण्यासाठी !
फक्त एकदाच रे, फक्त एकदाच !